जिल्हा परिषद मोर्वे शाळेत बालआनंद मेळावा उत्साहात संपन्न
खंडाळा प्रतिनिधी
गणेश गुरव
खंडाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोर्वे या ठिकाणी अनोख्या पद्धतीने अहिरे केंद्राचा बाल आनंद मेळावा अतिशय उत्साहात संपन्न झाला .जिल्हा परिषद सदस्य श्री संतोष साळुंखे पंचायत समिती सदस्य श्री संतोष वीर ,सौ वंदनाताई धायगुडे, श्री अतुल बाबा पवार,यशवंत खुंटे व मोर्वे गावचे प्रशासकीय सरपंच माननीय श्री अंकुश पडळकर व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री राहुल धायगुडे सर्व सदस्य व मोर्वे ग्रामस्थ, अहिरे केंद्रप्रमुख श्रीरंग जाधव, मोर्वे शाळा मुख्याध्यापक सौ दिपाली जाधव,विषय तज्ञ वनिता घाडगे, माजी सरपंच मल्हारी जगताप, गोविंद धायगुडे, गुलदगड सर,या सर्वांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले.मेळाव्यासाठी केंद्रातील शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल केंद्रप्रमुख श्रीरंग जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.












