बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नूतन कार्यकारणी जाहीर..!

बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नूतन कार्यकारणी जाहीर..!

बारामती प्रतिनिधी : सिकंदर शेख 

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार, युवा नेते पार्थ पवार, जय पवार  यांच्या सूचनेनुसार बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ॲड किरण इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी शहर पक्ष कार्यालयात (दि:४) रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (अजित पवार गट) नवीन कार्यकारणी खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आली.

कार्याध्यक्ष पदी – गणेश सोनवणे, संभाजी माने, सयाजी गायकवाड, रियाज शेख,  उपाध्यक्षपदी – ऋषिकेश निलाखे, नानासो भगत, संतोष टाटीया, छगन आटोळे, सचिन काकडे, संजय गुळुमकर, सोमनाथ  नाळे , अन्सार आत्तार,  सरचिटणीसपदी-ॲड शिवकांत वाघमोडे, शैलेश वणवे, सुशिल राठोड, धनंजय  जमदाडे, वैभव बोरसे, मुकुंद  तारु, ॲड. वैभव  काळे, रोहित शहा, चिटणीसपदी – सुधीर पोतदार, सचिन  सकट, प्रशांत महाडिक, नवनाथ चौधर, राजू मदारी, सुभाष  मोहिते, कैलास  शिंदे, शंतनु बनकर यांची निवड करण्यात आली तर बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेल अध्यक्षपदी नवनाथ अपुणे, उदयोग व व्यापार सेल अध्यक्ष प्रविण आहुजा, आय.टी.सेल अध्यक्ष संजय दुधाळ,  सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष गजानन  गायकवाड, ग्राहक संरक्षण समिती सेल अध्यक्ष हारुण शेख, सेवा दल अध्यक्ष ॲड धिरज लालबिगे, विद्यार्थी सेल अध्यक्ष- मेघराज माने यांची निवड करण्यात आली.

बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये स्थानिक पातळीवर संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात आला आहे. पदाधिकारी आणि  कार्यकर्त्यांना विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे शहरात पक्षाची ताकद अधिक मजबूत होणार असल्याची माहिती बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ॲड किरण इंगळे यांनी दिली. 

या प्रसंगी माजी नगराध्यक्ष  इम्तियाजभाई  शिकीलकर, युवक अध्यक्ष अभिजीत घाडगे, शहर पक्ष कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी (PRO) सुरज देवकाते, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष मेघराज माने उपस्थित होते.

महिला शहराध्यक्ष, युवती शहराध्यक्ष, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष व इतर राहिलेले सेलचे अध्यक्ष हे लवकरच जाहीर करण्यात येतील अशी माहिती शहराध्यक्ष ॲड किरण इंगळे यांनी माध्यमांना दिली.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें