चाळीसगाव नगरपालिकेच्या 18 प्रभागातील 36 जागासांठी आरक्षण सोडत जाहीर, आरक्षणाच्या सोडतीत सर्वसाधारण गटाला सर्वाधिक संधी

चाळीसगाव नगरपालिकेच्या 18 प्रभागातील 36 जागासांठी आरक्षण सोडत जाहीर, आरक्षणाच्या सोडतीत सर्वसाधारण गटाला सर्वाधिक संधी

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) 

आगामी होऊ घातलेल्या चाळीसगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी बहुप्रतिक्षित प्रभाग निहाय आरक्षण सोडत आज 7 रोजी सकाळी 11 वाजता पालिकेच्या सभागृहात पार पडले, यात 18 प्रभागांतील 36 जागासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. या आरक्षणातून ‘जनरल’ प्रवर्गातील पुरुषांचे वर्चस्व सिद्ध झाले असून, महिलांसाठी ११ जागा ‘जनरल’ गटातून आरक्षित झाल्या आहेत. जाहीर झालेले आरक्षण पाहता, आरक्षणाच्या सोडतीत सर्वसाधारण गटाला सर्वाधिक संधी मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे अनेक प्रबळ विद्यमान नगरसेवकांना धक्का बसणार हे मात्र नक्की, दरम्यान ​या आरक्षणामुळे निवडणुकीचे संपूर्ण चित्र पालटणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी तातडीने आपापल्या प्रभागातील जातीय आणि राजकीय गणिते मांडण्यास सुरुवात केली असून, लवकरच या आरक्षणावर हरकती-सूचना मागवण्यात येणार आहे, त्यानंतर अंतिम यादी जाहीर होणार आहे. या आरक्षणमुळे होणाऱ्या निवडणुकीत राजकीय मोठे उलटफेर होणार हे मात्र नक्की सुटलेल्या या गुंतागुंतीच्या आरक्षणमुळे नगर पालिकेत

कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता चाळीसगाव वासियांना लागली आहे. 

 

*प्रभाग निहाय आरक्षण खालील प्रमाणे*

 

*प्रभाग क्र.* *अ* *ब*

प्रभाग क्र. 1 – जनरल पु.- जनरल स्त्री

प्रभाग क्र. 2 – जनरल पु.- एसी स्त्री

प्रभाग क्र. 3 – जनरल पु.- जनरल स्त्री

प्रभाग क्र. 4 – जनरल पु.- ओबीसी स्त्री

प्रभाग क्र. 5 – एसी पु.- जनरल स्त्री

प्रभाग क्र. 6 – जनरल पु.- ओबीसी स्त्री

प्रभाग क्र. 7 – ओबीसी पु.- जनरल स्त्री

प्रभाग क्र. 8 – ओबीसी पु.- जनरल स्त्री

प्रभाग क्र. 9 – एसी पु. – जनरल स्त्री

प्रभाग क्र. 10 – ओबीसी पु.- जनरल स्त्री

प्रभाग क्र. 11 – ओबीसी पु.- जनरल स्त्री

प्रभाग क्र. 12 – जनरल पु.- एसी स्त्री

प्रभाग क्र. 13- जनरल पु.- ओबीसी स्त्री

प्रभाग क्र. 14 – जनरल पु.- ओबीसी स्त्री

प्रभाग क्र. 15 – जनरल पु.- ओबीसी स्त्री

प्रभाग क्र. 16 – जनरल पु.-जनरल स्त्री

प्रभाग क्र. 17 – ओबीसी पु.- जनरल स्त्री

प्रभाग क्र. 18 – जनरल पु.- एसटी स्त्री

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें