शिक्षकांनी मुलांमध्ये जिद्द व चिकाटी निर्माण करावी : उद्योजक अशोक शेठ भिलारे  मर्डेश्वर माथ्यावरील मरडमुरे येथे पंचक्रोशीतील मुलांना ट्रॅक सूटचे वाटप.

शिक्षकांनी मुलांमध्ये जिद्द व चिकाटी निर्माण करावी : उद्योजक अशोक शेठ भिलारे

 मर्डेश्वर माथ्यावरील मरडमुरे येथे पंचक्रोशीतील मुलांना ट्रॅक सूटचे वाटप.

खंडाळा प्रतिनिधी : गणेश गुरव 

 जावली तालुक्यातील मर्डेश्वर डोंगरावरील *मरडमुरे , धनगरवस्ती, कुंभारगणी .रेंडीमुरा आणि धनगरवाडी* या शाळेतील सर्व मुलांना स्वातंत्र्यदिनी कुंभारगणी गावचे *मुंबईस्थित उदयोजक श्री . अशोक शेठ भिलारे* यांनी ट्रॅक सूट भेट दिले . यावेळी बोलताना श्री अशोक शेठ भिलारे म्हणाले दुर्गम भागातील मुलांची बुद्धिमत्ता चांगली आहे .A.I. च्या युगात टिकण्यासाठी शिक्षकांनी त्यांच्यामध्ये जिद्द व चिकाटी निर्माण करावी . मेहनत केल्यावर त्याचे फळ मिळतेच हा आत्मविश्वास मुलांमध्ये निर्माण करावा असे मत व्यक्त केले

   *मर्डेश्वर विभागाचे नेते व कुंभार गणी गावचे सरपंच श्री . संजय शेलाटकर* यांनी ग्रामीण भागात चांगले शिक्षक कार्यरत असून विद्यार्थी गुणवत्ता चांगली आहे असे गौरवोद्गार काढले . अशोक शेठ भिलारे यांना जन्मभूमी बद्दल आस्था असून ते नेहमी सार्वजनिक कामांसाठी मदतीचा हात देत असतात .असे मत व्यक्त केले.*यावेळी सर्व शिक्षकांच्या वतीने भिलारे दांपत्याचा संपूर्ण पोशाख देऊन नागरी सत्कार करण्यात आला* .

  यावेळी धनगरवस्ती शाळेतून बदली झालेले *श्री .ज्ञानेश्वर धायगुडे* यांचाही निरोप समारंभ घेण्यात आला . यावेळी बोलताना श्री . धायगुडे म्हणाले .. संपूर्ण नोकरीमध्ये अशी प्रेमळ माणसे मला या दुर्गम अशा धनगर वस्तीत मिळाली .

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री . सुधीर भोसले यांनी केले . प्रास्ताविक श्री . गणेश जगताप यांनी केले . कार्यकम यशस्वी करण्यासाठी सौ. सिंधू जाधव मॅडम, श्री .दिगंबर होले सर महादेव बोरफळे सर , सागर राऊत सर , श्री.निलेश साठे सर ,श्री. प्रसन्न दांडगे सर यांनी सहकार्य केले . . यावेळी मरडमुरे गावचे सरपंच श्री . मारूती ढेबे, दरे बुद्रूकचे माजी सरपंच श्री . दत्ता भाऊ पार्टे सर्व शाळांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य अंगणवाडी ताई पंचक्रोशीतील ग्रामस्थ व महिला उपस्थित होते .शेवटी श्री. भास्कर मर्ढेकर सर यांनी आभार मानले .

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें