नागपूर येथे आयोजित पूर्व विदर्भ शिवसेना पदाधिकारी बैठकीत गडचांदूर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. अरविंद गोरे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे
शिवसेना पूर्व विदर्भ पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक नागपूर येथील हॉटेल सेंट्रल पॉईंट मध्ये संपन्न झाली.
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ,धर्मवीर आनंद दिघे साहेब, शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.ना. एकनाथ भाई शिंदे यांच्या शिवसेना पक्षावर विश्वास ठेवत श्री बंडूभाऊ हजारे जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर येथील सामाजिक कार्यकर्ते अरविंद गोरे यांनी पक्ष प्रवेश केला आहे.
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री.ना. उदय सावंत साहेब (उद्योग मंत्री) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. त्यावेळी राज्यमंत्री श्री आशिष जी जयस्वाल, शिवसेना सचिव संजयजी मोरे, भंडारा विधानसभेचे आमदार श्री नरेंद्र भोंडेकर साहेब, विधान परिषदेचे आमदार कृपालजी तुमाने साहेब, पूर्व विदर्भ संघटक प्रमुख श्री किरणजी पांडव, चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख किशोरजी राय, चंद्रपूर जिल्हाप्रमुख श्री बंडूभाऊ हजारे, कोरपना तालुकाप्रमुख राकेश जी राठोड, गडचांदूर शहर प्रमुख विकी राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचांदूर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री अरविंद गोरे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश घेत राजकीय भविष्यात भाग घेतला असून त्यांचा गडचांदूर वार्ड क्रमांक सहा येथे मोठा जनसंपर्क असल्याचे निदर्शनात येते. गोरे यांच्या पक्षप्रवेशामुळे गडचांदुरात शिवसेनेला चांगला पाठबळ मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
यंदाच्या वर्षी गडचांदूर नगरपरिषदेच्या निवडणुकीपूर्वी पुन्हा मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचे तालुकाप्रमुख राकेश राठोड यांचे म्हणणं आहे.













