शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात रयत सेनेचा सन्मानचिन्ह देवून शेकापचे जयंत पाटील पाटील यांच्या हस्ते गौरव
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव)
समाजातील वंचीत दुर्लक्षित बांधवांचा निस्वार्थ सेवाभाव ठेवणे शिवाय गरजू, शेतकरी, कष्टाकरी, विद्यार्थी आदींच्या समस्यांसाठी रयत सेनेच्या वतीने अविरत सामाजिक कार्य सुरू आहे, रयत सेनेच्या समाज कार्याची शेकापच्या वतीने दखल घेत भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने दि ९ रोजी चाळीसगावातील वैभव मंगल कार्यालयात आयोजित विभागीय मेळाव्यात शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या हस्ते रयत सेनेचा सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. याप्रसंगी राज्यस्तरावरील शेकापचे मान्यवर उपस्थित होते.
रयत सेनेचा सन्मान हा आम्ही आजपर्यंत केलेल्या समाजसेवेचा सन्मान असून यात माझ्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सन्मान झाला असल्याच्या भावना रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी व्यक्त केल्या. भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या चाळीसगाव विभागीय मेळाव्याचे आयोजन शेकापचे गोकुळ पाटील व शेकापच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले होते. दि ९ जून रोजी वैभव मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी सांगितले की शेतकऱ्यांप्रती राज्य सरकारचे ध्येय धोरणे चुकीचे असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे, तसेच शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धान्य मालाला योग्य भाव मिळत नाही , शेतकऱ्यांच्या शेत मालाला हमी भाव शासनाने द्यावा तसेच शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यावी तेव्हाच शेतकरी जगणार असल्याचे सांगत गोकुळ पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाचा विस्तार वाढवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करावे, यानंतर अनेक वक्त्यांनी शेतकऱ्यांचा धान्य मालाला भाव मिळण्यासह विविध विषयांवर मार्गदर्शन करत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेण्याची मागणी केली, समाजातील वंचीत दुर्लक्षित बांधवांचा निस्वार्थ सेवाभाव ठेवणे हाच यशस्वी जीवनाचा मुलमंत्र आहे. निस्वार्थतेने केलेल्या सेवेने कुणाचेही हृदयपरिवर्तन केले जावू शकते. आपण आपल्या आचरणात नेहमीच सेवेची भावना ठेवावी, जेणे करून इतरांना प्रेरणा मिळेल आणि यशाच्या मार्गावर ते अग्रेसर होतील यासाठी रयत सेनेच्या वतीने जन सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी लढा उभारून जनतेला न्याय देण्याचे सामाजिक कार्य सातत्याने केले जात आहे, रयत सेनेच्या कार्याची दखल घेऊन भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या दि ९ जून रोजी वैभव मंगल कार्यालयात आयोजित विभागीय मेळाव्यात रयत सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला, याप्रसंगी राज्यस्तरावरील शेकापचे मान्यवरासह प्रा चंद्रकांत ठाकरे उपस्थित होते, पुरस्कार स्वीकारताना रयत सेनेचे प्रदेश सचिव प्रमोद वाघ, प्रदेश समन्वयक पी एन पाटील, शहर अध्यक्ष प्रदीप मराठे, शहर संघटक शिवाजी गवळी, कार्याध्यक्ष प्रकाश गवळी, तालुका संघटक दिपक देशमुख यांच्या सह रयत सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,













