संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2025 पूर्वतयारीसाठी दिंड्याना साहित्य वाटप
खंडाळा प्रतिनिधी :गणेश गुरव
फलटण व खंडाळा तालुक्यातील संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्यामध्ये पायी वारी करणाऱ्या दिंडींना तरडगाव चे चोपदार श्री सुरेश जाधव व खंडाळा तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष ह भ प ऍड गजेंद्र मुसळे यांच्या प्रयत्नातून तसेच फलटण खंडाळा तालुक्यातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने यंदाच्या 24 व्या वर्षी लोणंद येथील श्री संत सेना महाराज मंदिरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख चोपदार ह भ प श्री बाळासाहेब महाराज रणदिवे अण्णा यांच्या शुभहस्ते दिंडी प्रमुखांना राहुटी,स्टीलची भांडी,औषधाचे किट वाटप करण्यात आले.यावेळी माऊली सेवादल तरडगाव यांच्या वतीने फलटण खंडाळा तालुक्यातील बाल वारकऱ्यांना त्यांच्या कौशल्यानुसार पुरस्कारांचे वाटप करण्यात आले .यावेळी चोपदार ह भ प श्री बाळासाहेब महाराज रणदिवे यांनी पालखी सोहळ्याच्या संदर्भात मार्गदर्शन केले.त्यावेळी म्हणले की,अनेक दानशूर व्यक्तींना दान करण्याची इच्छा असते परंतु त्यांना मार्ग मिळत नाही.सुरेश जाधव ह्यांच्या माध्यमातून आणि दोन्ही तालुक्यातील वारकरी मंडळी यांच्या सहकार्याने अविरतपणे दोन तप दानवाटपाचा उपक्रम हाती घेण्यात येतो ह्यापेक्षा पुण्याचे काम दुसरे असू शकत नाही.भागातील सामाजिक संस्थांनी देखील त्यांच्या कार्याला हातभार लावण्याची अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी ह भ प श्री सोपान काका टेंभुकर पंढरपूर, ह भ प दिलीप महाराज झगडे, ह भ प श्री संतोष महाराज जाधव,ह भ प श्री सत्यवान महाराज जाधव,माऊली सेवा दलाचे अध्यक्ष श्री. सतीश गायकवाड
आणि फलटण खंडाळा तालुक्यातील वारकरी व संत सेना महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री शंकरराव मर्दाने, कार्याध्यक्ष दिलीपराव साळुंखे सचिव श्री किशोर पवार,डॉ. श्री दयाराम सूर्यवंशी,श्री विकास साळुंखे,श्री माऊली देवकर, श्रीगणेश देवकर चोपदार, श्री अशोक देवकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सूत्रसंचालन ऍड गजेंद्र मुसळे यांनी केले तर आभार श्री शंकरराव मर्दाने यांनी मानले .













