अभिलेखावरील सराईत गुन्हेगारास जेरबंद करुन त्याचेकडुन बेकायदेशिर देशी बनावटीच्या पिस्टल, जिवंत काडतुसे, मोबाईल हॅन्डसेट व मोटार सायकल असा एकुण 2,53,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.

अभिलेखावरील सराईत गुन्हेगारास जेरबंद करुन त्याचेकडुन बेकायदेशिर देशी बनावटीच्या पिस्टल, जिवंत काडतुसे, मोबाईल हॅन्डसेट व मोटार सायकल असा एकुण 2,53,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.

सातारा प्रतिनिधी:

श्री. तुषार दोषी पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी विशेष मोहिम राबवुन विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याच्या यांना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे अरुण देवकर

 

सुचना अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुनहे शाखा, सातारा पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी सहा. पोलीस निरीक्षक रोहित फार्णे व पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांचे अधिपत्याखाली विशेष पथके तयार करुन कारवाई करण्याचे सुचना दिलेल्या आहेत. अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुनहे शाखा, सातारा यांचे सुचने प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांची पथके दिनांक 09/06/2025 रोजी कराड शहर, कराड तालुका व मसुर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंध पेट्रोलींग करीत होते. दरम्यान पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे गोपनिय बातमीदारचे मार्फत बातमी मिळाली की, अभिलेखावरील सराईत गुन्हेगार तन्वीर अली पटेल रा. वाघेरी, ता. कराड, जि. सातारा हा त्याचे साथिदारांचे सोबत त्यांचेकडील चॉकलेटी रंगाचे अॅक्टीवा मोटार सायकल क्रमांक एमएच-50 – जी- 1775 वरुन गावठी पिस्टलची विक्री करणे करिता कराड ते पुसेसावळी जाणारे रोडने जाणार आहेत अशी बातमीमिळाल्याने त्यांनी सदर सहा. पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांचे पथकास देवुन मिळाले बातमीच प्रमाणे कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे पथकाने कराड ते पुसेसावळी रोडवर नायरा पेट्रोल पंपाचे शेजारी सापळा लावला. त्यानंतर थोड्याच वेळात अभिलेखावरील सराईत गुन्हेगार तन्वीर शेख व त्याचे दोन साथिदार हे मोटार सायकलवरुन येत असताना त्यांना शिताफीने पकडुन ताब्यात घेवुन त्यांचेकडुन 02 देशी बनावटीची पिस्टल, 05 जिवंत काडतुसे, 01 मोकळी मॅग्झीन, 03 मोबाईल हॅन्डसेट व मोटार सायकल असा एकुण 2,53,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन कराड शहर पोलीस ठाणे येथे अवैध शस्त्र बाळगले बाबत गुरनं. 680/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3(1), 7, 25 प्रमाणे गुन्हा नोंद करुन कारवाई करण्यात आली आहे.

 

सदर कारवाई मध्ये श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सपोनि रोहित फार्णे, पोउनि परितोष दातिर, विश्वास शिंगाडे, सफौ. अतीष घाडगे, पोहवा विजय कांबळे, शरद बेबले, लेलैश फडतरे, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव, अमित सपकाळ, अमित माने, अरुण पाटील, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, गणेश कापरे, मोहन पवार, ओंकार यादव, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, रविराज वर्णेकर चालक सफौ. शिवाजी गुरव व पंकज बेसके यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे. सहभागी अधिकारी अंमलदार यांचे पालीस अधीक्षक, सातारा, व अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें