पाथर्डी शहरात ३ कोटी ५३ लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न..!
पाथर्डी शहरातील वैशिष्ट्यपूर्ण योजना व नगरोत्थान योजने अंतर्गत विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आज उत्साहात पार पडला. या विकास प्रकल्पांसाठी तब्बल ३ कोटी ५३ लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे पाथर्डी शहराच्या सर्वांगीण विकासात मोठी भर पडणार आहे.
विकास कामे…
१) नगरपरिषद पाथर्डी अंतर्गत आनंदनगर मधिल गायछाप रस्ता ते वामनभाऊ मंदिरा पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे.
२) पाथर्डी नगरपरिषद पाथर्डी अंतर्गत शेवगांव रोड ते बसवेश्वर नक्षर रस्ता काँक्रीटीकरण करणे.
३) पाथर्डी नगरपरिषद पाथर्डी अंतर्गत कोरडगाव रोड ते राष्ट्रीय महामार्ग ६१ ते बालवे वस्ती जुना खेर्डा रस्ता पर्यंत कॉक्रीटीकरण करणे.
४) नगरपरिषद पाथर्डी अंतर्गत काळे वस्ती रस्ता ते भापकर वस्ती रस्ता खडीकरण व मजबुतीकरण करणे.
५) नगरपरिषद पाथर्डी अंतर्गत संजय नाथनगर मुख्य रस्ता ते पुजा टावर्स पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे.
६) नगरपरिषद पाथर्डी अंतर्गत संजय खोले घर ते देविदास मोरे घर रस्ता खडीकरण व मजबुतीकरण करणे.
७) नगरपरिषद पाथर्डी अंतर्गत टिपरे घर ते शेवगाव रोड रस्ता काँक्रीटीकरण करणे.
८) पाथर्डी नगरपरिषद अंतर्गत वामनभाऊनगर मधिल मुख्य रस्ता ते रविंद्र गर्जे सर घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे.
९) नगरपरिषद पाथर्डी अंतर्गत वामनभाऊनगर येथील जगदीश पातकळ घर ते जायभाय घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे.
१०) पाथर्डी नगरपरिषद अंतर्गत वामनभाऊनगर येथील रुपाली टेलर ते विशाल रोकडे घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे.
११) नगरपरिषद पाथर्डी अंतर्गत वामनभाऊनगर येथील पानसंबळ किराणा ते डॉ.वाघ ते सिध्देश्वर घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे.
१२) नगरपरिषद पाथर्डी अंतर्गत वामनभाऊनगर मधिल शिंदे भाऊसाहेब घर ते कराड घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे.
१३) नगरपरिषद पाथर्डी अंतर्गत आसरानगर, धामणगांव रोड, महादेव मंदिर सभामंडप बांधणे व पेव्हिंग क्लॉक बसविणे.
१४) नगरपरिषद पाथर्डी अंतर्गत गर्जे कॉम्प्लेक्स ते बालाजी रेसिडेन्सी पर्यंत पथदिवे बसविणे.
या प्रमाणे विविध विकास कामे पूर्ण होणार असुन. ग्रामस्थांच्या मूलभूत गरजा आणि शाश्वत विकास या दोन्ही गोष्टींचा विचार करून ही कामे आखण्यात आली आहेत.
या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अपेक्षा समजून घेतल्या. पाथर्डी तालुक्याचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास हा आमचा प्राथमिक उद्देश आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.













