तासिका तत्वावर शिक्षक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

तासिका तत्वावर शिक्षक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा, – महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागांतर्गत सातारा जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त अनूसुचित जाती/ नवबौध्द मुलांकरीता शासकीय निवासी शाळा,म्हसवड ता.माण जि.सातारा येथे शासकीय शाळा कार्यान्वीत आहे. या शाळेत इयत्ता ६ वी ते १० वी साठी तासिका तत्वावर ६ महिने किंवा नियमित शिक्षक हजर होईपर्यंत तासिका तत्वावर सहाय्यक शिक्षक या पदासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज आवश्यक शैक्षणीक अहर्तेचे कागदपत्रे अनुसचित जाती नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा,म्हसवड ता. माण येथे सादर करावेत असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण सुनिल जाधव यांनी केले आहे.

सहायक शिक्षक प्राथमिक या पदासाठी एचएससी, बीए/बीएस्सी/ डिएड राहिल. तसेच सहाय्यक शिक्षक (माध्यमिक) या पदासाठी बी.ए.बी.एड –मराठी,हिंदी,गणित/विज्ञान अशी शैक्षणिक पात्रता राहील.

पदसंख्या प्राथमिक विभाग एकुण ३ व माध्यमिक विभाग एकुण ४ इतकी आहे .उमेदवारांची निवड करताना अनुभव तसेच टिईटी परिक्षा उत्तीर्ण असणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल. या पदासाठी घडयाळी तासाप्रमाणे शासकीय नियमानुसार मानधन देय राहिल. तसेच या एकत्रित मानधनाखेरीज इतर कुठलेही भत्ते देय राहणार नाहीत. किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलावण्यास पात्र असणार नाही. सेवा प्रवेश् नियम व शासनाकडून वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा तसेच कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार भरती प्रवेश प्रकिया राबविण्यात येईल. सदर पदे ही मानधन तत्वाची असून भरती प्रकियेचे सपुंर्ण अधिकार, पदे कमी जास्ती करणे, भरती प्रकीया कोणत्याही टप्प्यावर रद्द करणे अटी व शर्ती मध्ये बदल करणे, तसेच कोणतेही कारण न देता सेवा समाप्त करण्याचे अधिकार सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सातारा यांनी राखून ठेवले आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें