रोटरी क्लब तर्फे गरजूंना शिलाई मशीन व सायकल वितरण

रोटरी क्लब तर्फे गरजूंना शिलाई मशीन व सायकल वितरण

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :- 

रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव तर्फे विनामूल्य शिलाई मशीन व सायकल वितरण हा कार्यक्रम तहसीलदार प्रशांत पाटील, यांच्या उपस्थितीत नुकताच पूर्णपात्रे रोटरी हॉल येथे संपन्न झाला. कार्यक्रमासाठी चाळीसगाव शहरातील व तालुक्यातील काही विधवा, घटस्फोटीत व गरजू महिलांसाठी सिंगर कंपनीचे शिवण मशीन व गरीब होतकरू व शिक्षणाची आवड असलेले शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना हिरो कंपनीच्या सायकल वाटप करण्यात आले. या प्रसंगी लाभार्थ्यांनी मनोगतात सर्वप्रथम रोटरी मार्फत नेहमी समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात, या वेळेस आम्हाला उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीन उपलब्ध करून दिल्या. तसेच आम्हाला शिक्षण घेतांना शाळेत जाण्यासाठी आम्हाला सायकली उपलब्ध करून दिल्या यासाठी आमचा विचार केला हे खूप महत्वाचे आहे, यामुळे आम्ही भारावून गेलो व त्यांनी तोंड भरून रोटरी परिवाराचे कौतुक केले. समारंभाची कल्पना रोटरी क्लबच्या सदस्या रोटे पूजा अनिल मालपुरे यांनी सुचवली. रोटरी प्रांत ३०३० यांचे या प्रकल्पाला सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी अध्यक्ष अनिल मालपुरे यांनी केले, प्रमुख वक्त्यांची ओळख प्रकल्प प्रमुख रोटे. निळकंठ पाटील यांनी करून दिली. प्रमुख अतिथी यांनी आपल्या मनोगतातून मानवाला चाकाचा (चक्राचा) शोध लागला आणि तेथुन मानवाची प्रगती सुरु झाली. चक्राने माणसाला गती मिळते तसेच रोटरी सुद्धा नेहमीच सामान्य माणसाच्या आयुष्याला गती मिळावी व त्याची प्रगती व्हावी असाच विचार करीत असते. तेच चाक सायकलला आले आणि प्रगती झाली, कामात वेळ वाचला. मुले सायकली वर शाळेत जाऊ लागले. शिक्षणात प्रगती झाली. पुढे चालून शिलाई मशीनला चाक आले आणि प्रगती झाली शिवणकामात. कलेला वाव मिळाला. वेगवेगळी नक्षी काढून कामात गती आली आणि हाताला काम मिळाले. घरखर्चाला पैसा मिळाला. चाक फिरु लागले मडके घडू लागले. चाकामुळे प्रगती झाली. राष्ट्रीय ध्वजात चक्र आहे, आपल्या प्रगतीचे प्रतीक चाक आहे, याविषयी श्री प्रशांत पाटील तहसीलदार चाळीसगाव यांनी अनमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटे ब्रिजेश पाटील व रोटे डॉ रविंद्र निकम यांनी केले. रोटे डॉ शुभांगी पूर्णपात्रे यांनी लाभार्थ्यांना जाणीव करून दिली की ज्या रोटरी सदस्यांनी त्यांच्या कष्टाच्या पैशामधून तुम्हाला ह्या वस्तू उपलबध करून दिल्यामुळे त्याची तुम्ही जाणीव ठेवा. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटे निलेश शर्मा, रोटे कांतीलाल पटेल, रोटे श्रेयस सोनजे, रोटे विजय शाह, सुनिल मालपुरे व संजय जाधव यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी ज्यांनी दातृत्व स्वीकारले असे क्लबचे रोटरी सदस्य रोटे श्रीकांत मोरकर, रोटे निलेश ढोले, रोटे अक्षय बागड, रोटे चंद्रेश लोडाया, रोटे पूजा मालपुरे, रोटे डॉ शुभांगी पूर्णपात्रे, रोटे मनिषा मालपुरे, रोटे नयना पाटील, रोटे निलेश शर्मा, रोटे प्रितेश कटारिया, रोटे ब्रिजेश पाटील, रोटे संजय चौधरी, रोटे हिम्मत पटेल, रोटे नितीन पाटील, रोटे राजेंद्र अमृतकार व रोटे अनिल मालपुरे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें