बोरगाव पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी: तडीपार गुन्हेगाराकडून देशी बंदूक जप्त

बोरगाव पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी: तडीपार गुन्हेगाराकडून देशी बंदूक जप्त

सातारा, दि. १५ मे २०२५: बोरगाव पोलीस ठाण्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. डी. एस. वाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तडीपार सराईत गुन्हेगार मनोज उर्फ सोन्या वाघमारे याला अटक करून देशी बंदूक आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. या कारवाईमुळे बेकायदेशीर शस्त्रसाठ्यावर नियंत्रण मिळाले असून, जनतेकडून कौतुक होत आहे.

 

पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले यांच्या सूचनांनुसार, श्री. वाळवेकर यांना गोपनीय माहिती मिळाली की, तडीपार गुन्हेगार मनोज वाघमारे शिवाजीनगर, वेचले येथे येणार आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने बसथांब्याजवळ सापळा रचला. संशयित पळून जाण्याचा प्रयत्न करताना पथकाने त्याला पकडले. अंगझडतीत बंदूक, काडतुसे, मोबाइल आणि मोटारसायकल असा २,२७,६००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. तडीपार आदेश भंग आणि शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला.

 

श्री वाळवेकर सहा. पोलीस निरीक्षक महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रशांत चव्हाण, दीपक मांडवे, कॉन्स्टेबल केतन जाधव,

 सतीश पवार, उत्तम गायकवाड यांनी कारवाई केली. तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक कारळे करत आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें