चाळीसगाव येथे नागद रोडवरील पेट्रोलपंपा जवळलील मीरची बाजाराला आग १२ दुकाने खाक

चाळीसगाव येथे नागद रोडवरील पेट्रोलपंपा जवळलील मीरची बाजाराला आग १२ दुकाने खाक

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) : 

चाळीसगाव येथील नागद रोडवर असलेल्या मिरची बाजाराला शुक्रवारी दि. ११ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक मोठी भीषण आग लागली. या आगीत जवळच असलेल्या अविरेखा पेट्रोलपंप थोडक्यात बचावला. तर या आगीत १२ दुकाने जळून खाक झाली आहे तर जवळपास ५० ते ६० लाखाचे मिरची व्यापारांचे नुकसान झाले आहे. यात एक मालट्रक व दुचाकी जळून खाक झाली आहे. अचानक बाजाराला एका बाजूने आग लागण्यास सुरुवात झाली. या आगीने मोठे रौद्र रूप धारण केल्याने एकच धावपळ उडाली. बाजाराच्या बाहेर व्यापारी, नागरिक तत्काळ निघाले. (केएफएन) बाजारात लागलेल्या दुचाकी बाहेर काढायला लोकांनी सुरुवात केली. आजूबाजूचे नागरिक देखील मोठ्या संख्येने मदतीला धावून आले. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती मिळताच तत्काळ ४ त ५ बंब घटनास्थळी दाखल झाले होते. बाजाराच्या बाजूला असणारा डॉ. अविनाश जाधव यांचा अविरेखा पेट्रोलपंपाजवळ आग जाणार होती. अग्निशमन दलाने तत्काळ आग विझविण्यास सुरुवात केल्याने हा पेट्रोलपंप आगीच्या चपेट्यात आल्यापासून थोडक्यात बचावला. मात्र जवळील एक मालट्रक आणि बाजारातील दुचाकी जळून खाक झाली आहे. यावेळी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, कर्मचारी आणि माजी आमदार राजीव देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली. चाळीसगाव शहरात मागील दोन ते तीन दिवसांमध्ये आग लागण्याची ही दुसरी घटना घडलेली आहे. साधारणतः दोन ते तीन दिवसांपूर्वी चाळीसगाव-मालेगाव रोडवरील बेलगंगा सहकार कारखान्याजवळ आग लागली होती. मिरची बाजाराच्या आगीत सुमारे ५० ते ६० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे आहेत. आगीचा लोळ सुमारे ५ किलोमीटरपर्यंत दिसून येत होता.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें