निरगुडी गावातील दलित होलार समाज बांधवांचे हक्काच्या रस्त्यासाठी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन.

निरगुडी गावातील दलित होलार समाज बांधवांचे हक्काच्या रस्त्यासाठी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन.

निरगुडी गावातील दलित होलार समाज बांधवांना वस्तीत जाणेसाठी हक्काचा बारा फुटी गाडीरस्ता मिळावा यासाठी ॲड. रामचंद्र घोरपडे आणि होलार समाजाचे ज्येष्ठ नेते अशोक गोरे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

   यावेळी ॲड.रामचंद्र घोरपडे यांनी निरगुडी येथे होलार समाजाची 200 ते 250 लोकवस्ती आहे. परंतु दुर्दैवाने आजही हक्काचा गाडी रस्ता नसल्याने वस्तीतील लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे गाडीरस्त्याचा प्रश्न प्रशासनाने तात्काळ मार्गे लावावीत असे सांगितले. 

       महेंद्र गोरे यांनी यापूर्वीही होलार समाजाच्या वतीने रस्ता मिळण्यासाठी अनेकदा निवेदने दिली आहेत परंतु त्याबाबत शासनाकडून कोणत्याही स्वरूपाची ठोस पावली उचलली जात नाहीत असे सांगून नाराजी व्यक्त केली.

   आता तरी निरगुडी गावातील दलित होलार समाज बांधवांना मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

    यावेळी होलार समाजाचे युवक नेतृत्व निलकुमार गोरे युवा नेते राहुल करे, होलार समाजाचे फलटण तालुका उपाध्यक्ष ओमकार अहिवळे, पत्रकार प्रशांत सोनवणे,अजित गोरे, आदेश गोरे, योगेश गोरे, अमित आवटे, प्रविण गोरे, विघ्नेश गोरे, आदित्य गोरे, जयकुमार गोरे ,सुर्यभान सोनवणे आदी समाज बांधव उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें