महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी राज्य शासनाच्या सर्व प्रशासकीय विभागांसाठी 100 दिवसांचा आराखडा निश्चित :तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव
महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांचे जीवनमान सुकर होणेकामी सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शासन क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र.७ /र. व.का दि. १३/०१/२०२५ राज्य शासनाच्या सर्व प्रशासकीय विभागांसाठी १०० दिवसांचाआराखडा निश्चित करणेत आलेला असुन त्यामधील विषय सुकर जीवनमान (Ease of living) अंतर्गत मा. जिल्हाधिकारी यांनी खालील तीन विषय समाविष्ट करणेचे निर्देश दिलेले आहेत.
१. ८ ऑगस्ट २०२३ च्या शासन अधिसुचनेनुसार निर्धारीत केलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे तुकडे वगळता उर्वरीत ७/१२ वरील “तुकडा” शेरा कमी करणेबाबत.
२. एकुमँ नोंदी कमी करणेबाबत, वारस नोंदी करणे, लक्ष्मी मुक्ती योजना राबविणे
३. गावनकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते/पाणंद/पांदण / शेतरस्ते/शिवार
रस्ते/शेतावर जाणेचा पायमार्ग लोकसहभागाद्वारे मोकळा करणे / अतिक्रमणमुक्त करणे
४.त्याशिवाय फलटण तालुक्यामध्ये १८ वर्षे पुर्ण केलेल्या खातेदारांच्या नावासमोरील अ.पा.क नोंद कमी
करणे, तसेच विविध शासन निर्णयास अनुसरुन ३१ डिसेंबर १९८८ पूर्वीचे तगाई बोजे कमी करणे दि.२४/११/१९८९ पूर्वीचे बंडींग बोजे कमी करणे. तसेच भू-विकास बँकेचे इतर हक्कातील बोजे कमी करणे देखील समाविष्ट केलेले आहेत.
हे विषय
त्या अनुषंगाने फलटण तालुक्यात दि. १ जानेवारी २०२५ पासून आजवर केलेल्या कार्यवाहीनुसार निर्धारीत केलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे तुकडे वगळता उर्वरीत ७/१२ वरील “तुकडा” शेरा कमी केलेल्या ६६९६ संख्या, एकुमँ नोंदी कमी करणे जमीनगट संख्या २६२, वारस नोंदी करणे जमीनगट संख्या ५९३, इतके कामकाज फलटण तालुक्यात आजअखेर झालेले आहे. तरी सर्व नागरिकांनी महसूल मंडल अधिकारी आणि आपले ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांचेशी संपर्क साधून याबाबत कार्यवाही पूर्ण करुन घ्यावी. असे आवाहन प्रशासना तर्फे
करण्यात येथ आहे. “लक्ष्मी मुक्ती योजना” स्त्रियांचे हक्क सुरक्षित रहावे या दृष्टिने शासनाने दि.१५/०९/१९९२ रोजी परिपत्रक काढून आदेश दिले आहेत की. एखाद्या व्यक्तीने आपल्या स्वतःच्या जमिनीत आपल्या कायदेशीर पत्नीच्या नावाचा ७/१२ च्या उताऱ्यात स्वतः बरोबर सहहिस्सेदार म्हणून नोंद घ्यावी, अशी स्वेच्छेने विनंती केल्यास, महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ मधील कलमांच्या अधीन राहून फेरफार नोंदीबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण करून तशी नोंद घ्यावी. तरी यानुसार फलटण तालुक्यातील सर्व पुरुष खातेदारांनी आपल्या नावासोबत आपल्या कायदेशीर पत्नीचे नाव ७/१२ सदरी घेऊन महिलांना त्यांचा हक्क मिळवून देणेस मदत करावी असे आवाहन सर्व सुजाण नागरिकांना प्रशासना तर्फ करणेत येत आहे.













