छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्याची संभाजी सेनेची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्याची संभाजी सेनेची मागणी

चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव :-

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिग्नल यंत्रणा बसवण्याची मागणी संभाजी सेनेने केली आहे, गेल्या एक ते दीड महिन्यामध्ये या चौकामध्ये अपघात होऊन दोन लोकांचा जीव गेला असून भविष्यात हा छत्रपती शिवाजी महाराज चौक अपघात चौक म्हणून ओळखला जाऊ नये. भविष्यातील जीवित हानी टाळावी याकरिता या चौकामध्ये सिग्नल यंत्रणा बसवणे गरजेचे आहे, तरी येत्या तीन महिने म्हणजे मुबलक अशा कालावधी दरम्यान सिग्नल यंत्रणा बसवावी आणि ती कार्यान्वित करावी आणि जर तीन महिने म्हणजे २० एप्रिल पर्यंत सदर चौकात सिग्नल यंत्रणा बसविली नाही तर संभाजी सैनिक त्याच छत्रपती शिवाजी महाराज चौकात संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लक्ष्मण शिरसाठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करतील, आंदोलन प्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस् सर्वस्वी आपण आपले शासन आणि प्रशासनच जबाबदार राहील असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती आमदार मंगेश चव्हाण, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक, तसेच परिवहन मंत्री यांना पाठविलेल्या असून निवेदनावर शहराध्यक्ष आबासाहेब सोनवणे, तालुका अध्यक्ष गिरीश पाटील, रोजगार आघाडीचे अविनाश काकडे, मुंबई सम्पर्क प्रमुख विठ्ठलसिंग राजपूत, प्रविण पाटिल, सोनू कोळी, कनक देशमुख, बबलू हिरे, राहुल भिसे, नामदेव पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें