समृद्धी शिक्षक फाउंडेशनचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :-
बलिकादिनानिमित्त व सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त तालुकास्तरावर चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन
येथील समृद्धी शिक्षक फाउंडेशन तर्फे करण्यात आले होते, विविध शाळेतील 530 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी झाले होते.तीन गटात ही स्पर्धा झाली. त्याचे बक्षीस वितरण व गुणगौरव समारंभ नुकतेच नारायण बंकट वाचनालयात झाले. या स्पर्धेला आमदार मंगेश चव्हाण यांची उपस्थिती लाभली. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या अध्यक्षतेखाली हा गुणगौरव समारंभ पार पडला. व्यासपीठावर सेवा सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे चिटणीस राजेंद्र राठोड, शिक्षण विभागातील केंद्र प्रमुख राजेंद्र पाटील, उमवीचे सिनेट सदस्य प्रा. सुनील निकम, समृद्धी शिक्षक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश सूर्यवंशी, संस्थापक सचिव चित्रकार दिनेश चव्हाण, कार्याध्यक्ष प्रा. चंद्रकांत ठाकरे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांना समृद्धी शिक्षक फाउंडेशन तर्फे चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांनी शब्दांकन केलेले मानपत्र देण्यात आले. कार्यक्रमासाठी समृद्धी शिक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश सूर्यवंशी, सचिव चित्रकार दिनेश चव्हाण, कार्याध्यक्ष प्रा. चंद्रकांत ठाकरे, सहसचिव महेंद्र पवार, उपाध्यक्ष कामिनी पाटील, कोषाध्यक्ष प्रा. नितादेवी चव्हाण, संचालक जामराव पाटील, सोमनाथ चौधरी, दिनेश मोरे,
चेतन कुऱ्हाडे, प्रवीण पवार
यांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक प्रा. चंद्रकांत ठाकरे यांनी तर सूत्रसंचालन कामिनी पाटील व नीता चव्हाण यांनी केले. आभार दिनेश मोरे यांनी मानले.













