फलटण विडणी येथे अंधश्रद्धेतून नरबळी? सडलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह

फलटण विडणी येथे अंधश्रद्धेतून नरबळी? सडलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह

फलटण प्रतिनिधी : विडणी येथे ऊसाच्या शेतामध्ये एका महिलेचा निर्घण खून करण्यात आला असून याठिकाणी आढळून आलेल्या वस्तूवरून आघोरी घटना घडली असून या घटनेने विडणीसह संपूर्ण फलटण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत माहिती अशी की विडणी ता. फलटण येथील २५ फाटा नजीक व शिवाजी महाराज मठाच्या पश्चिमेच्या बाजूस गावातीलच डॉ. प्रदीप जाधव यांच्या उसात एका महिलेची निर्घण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे, या घटनेची माहिती विडणीच्या पोलीस पाटील सौ. शीतल नेरकर यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिले आहे. आज शुक्रवार दि. १७जानेवारी रोजी सकाळी ८ च्या सुमारास गावातील डॉ. प्रदीप जाधव हे आपल्या २५ फाटानजीक व शिवाजी महाराज मठाच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या आपल्या ऊसाच्या शेतात गेले असता त्यांना शेतामध्ये सडलेला वास आल्याने त्यांना आपल्या ऊसाच्या शेतात एका महिलेचा निर्घण खून झाल्याचे दिसून आले त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसपाटील सौ. शीतल नेरकर यांना दिली.

या ठिकाणी एका महिलेची जांभळ्या रंगाची साडी, परकर, पांढरा रंगाचा स्कार्प, चप्पल तसेच लिंबू नारळ, काळी बाहूली हळदीकुंकू ,गुलाल, दहीभात तसेच याठिकाणी आघोरी विधी केल्याचे सामान दिसून आले आहे, तसेच याच ठिकाणीच धारदार चाकू, सुरा यासारखे घातक हत्यारेही आढळून आली तसेच या महिलेचे मुंडन केलेले केस, रक्त व तेलाचे डागही दिसून आले आहेत यावरून या महिलेचा नरबळी दिला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.या घटनास्थळापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर याच महिलेची कवठी आढळून आली आहे तर थोड्याच अंतरावर याच महिलेचा शरीराच्या कमरेखालचा संपूर्ण भाग हिस्त्र प्राण्यांनी खालेला व सडलेल्या अवस्थेत आढळून आला या घटनेच्या परिसरात दुर्गंधी पसरलेली होती यावरून ही घटना सुमारे दहा ते बारा दिवसापूर्वीची असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधिक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी राहूल धस, पोलिसनिरीक्षक सुनील महाडिक उपनिरीक्षक मच्छिंद्र पाटील शिवाजी जायपत्रे, नागटिळे मॅडम यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिक माहिती घेतली दरम्यान टिमने संपूर्ण परिसरातील शेतामध्ये पाहणी केली असून याबाबतचा अधिक तपास पोलिस अधिकारी करत आहेत.

घडलेल्या या अघोरी घटनेने विडणी व संपूर्ण फलटण तालुका हादरला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, आज आपण कितीही प्रगतशील व महासत्तेच्या दिशेने जात असलो तरीही आजही समाजात अंधश्रद्धा, कर्मकांड व नरबळीसारख्या अंत्यत धोकादायक व संताप येणाऱ्या घटना घडतच आहेत हे मात्र फार दुर्देवी व चिंताजनक बाब आहे .

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें