पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 24 जानेवारी रोजी आयोजन

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 24 जानेवारी रोजी आयोजन

सातारा  प्रतिनिधी : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा व आर्टस, कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेज, नागठाणे, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक २४ जानेवारी रोजी आर्टस, कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेज, नागठाणे, सातारा येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.

या मेळाव्यात डिप्लोमा इंजिनिअर, कॉम्प्युटर ऑपरेटर, ग्रांईडर, फिटर, इलेक्ट्रिशियन, मशनिस्ट, टर्नर, १० वी पास / नापास, आय टी आय, कुशल/अर्धकुशल कामगार अशा प्रकारची १ हजार ४७ रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत. नोकरी इच्छुक उमेदवारांनी या संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावे. जेणेकरुन त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत.

  बेरोजगार उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन सहभागी व्हावे. याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या ०२१६२-२३९९३८ या दुरध्वनीवर संपर्क साधावा असेही, आवाहन सहायक आयुक्त श्री. पवार यांनी केले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें