मुंबई समुद्रात अपघातग्रस्त नौका मालकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकसान भरपाई १८ लक्ष ५५ हजाराचा धनादेश सुपूर्द

मुंबई समुद्रात अपघातग्रस्त नौका मालकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकसान भरपाई १८ लक्ष ५५ हजाराचा धनादेश सुपूर्द

मुंबई,दि.१६ : २८ डिसेंबर २०२४ रोजी मासेमारी नौकेला मुंबईतील समुद्रात चीन देशाच्या माल वाहतूक जहाजाने धडक दिल्याने मासेमारी नौकेचे नुकसान झाले होते. त्या मालवाहू जहाजाच्या कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १८ लक्ष५५ हजार रूपयांचा धनादेश नुकसानग्रस्त नौकेच्या मालकाला प्रदान करण्यात आला.

मंत्रालयात मंत्री परिषद संपल्यानंतर नुकसानग्रस्त नौका मालकाला धनादेश देण्यात आला. या वेळी मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते.

28 डिसेंबरला मुंबई समुद्रात हेमदीप टिपरी यांच्या मालकीच्या तिसाई या मासेमारी नौकेला मालवाहतूक जहाजाने धडक दिली होती. या धडकेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी मासेमारी नौकेचे मोठे नुकसान झाले होते.स्थानिक परवाना अधिकारी,सागरी पोलीस,बंदर निरीक्षक व मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष पंचनामा केला गेला होता.त्यानुसार रुपये १८ लक्ष ५५ हजार इतक्या नुकसान झाले असल्याचे सांगितले.

बंदरे विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार संबंधित जहाज कंपनी व अपघातग्रस्त नौका मालक यांची बैठक बोलवण्यात आलेली. त्या बैठकीत कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें