मि शेवगावकरचा दणका शेवगांव पोलीसांनी मोडला मुंगीच्या सूर्यकोटि निधी अर्बन लिमिटेड च्या संचालकांचा मणका एकास केले जेरबंद 

मि शेवगावकरचा दणका शेवगांव पोलीसांनी मोडला मुंगीच्या सूर्यकोटि निधी अर्बन लिमिटेड च्या संचालकांचा मणका एकास केले जेरबंद

शेवगांव तालुक्यातील मुंगी येथील सुर्यकोटी मल्टीस्टेट निधी लिमीटेड नावाची संस्था स्थापन करून सुमारे तीन कोटी रुपयांना चुना लावून एका फरार संचालकाला शेवगांव पोलिसांनी जेरबंद

 प्रविण भिसे शेवगांव

शेवगांव पोलीस स्टेशन ला मुख्य फिर्यादी श्री अशोक गणपत शेळके वय 36 दाखल 17/10/2024 फिर्यादी नुसार भामटा संचालक प्रशांत भारत जैस्वाल वय 30 वर्ष व त्याचा भाऊ पंकज उर्फ योगेश भारत जैस्वाल दोघे रा. मुंगी ता. शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांनी सन 2021 मध्ये मुंगी ता. शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथे सुर्यकोटी मल्टीस्टेट निधी लिमीटेड नावाची संस्था स्थापन केली होती. तेव्हा ते दोघे दिनांक 15/10/2023 रोजी मला फिर्यादीच्या घरी येवुन भेटले व त्यांनी सांगितले की, आमच्या संस्थेत पैसे गुंतवणुक केली तर तुम्हाला मासिक 12 % व्याजदर देईल असे त्यांनी सांगितल्याने व त्यांची संस्था ही खरी आहे का ??? याबाबत फिर्यादी यांनी त्यांचे मुंगी गावात पेठेमध्ये टाकलेल्या ऑफीस मध्ये गेले असता त्याठिकाणी ऑफीस मध्ये प्रशांत भारत जैस्वाल व त्याचा भाऊ पंकज उर्फ योगेश भारत जैस्वाल हे दोघे हजर होते तेव्हा त्या ठिकाणी फिर्यादीने यांना दोघांना भेटलो असता त्यांनी तुम्हाला आम्ही मासिक 12 टक्के व्याजदर देतो असे आश्वासन दिले. ते दोघे गावातील रहिवासी असल्याने फिर्यादीने त्यांना चांगले ओळखत असल्याने त्यांचे बोलण्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर प्रशांत भारत जैस्वाल व त्याचा भाऊ पंकज उर्फ योगेश भारत जैस्वाल यांच्या सुर्यकोटी मल्टीस्टेट निधी लिमीटेड या संस्थेत जावुन दिनांक 19/10/2023 रोजी 1,00,000/- रुपये ( अक्षरी एक लाख रुपये) फिर्यादीच्या शेतातील कापसाचे आल्याने त्याचा मो.नं. 9850804141 यानंबरवर फोन पे वर टाकले होते. त्यानंतर दिनांक 02/01/2024 रोजी दोन लाख रुपये, दिनांक 12/12/2023 रोजी फिर्यादीच्या शेतातील ऊसाचे आलेले दोन लाख रुपये रोख स्वरुपात दिले होते असे एकुण पाच लाख रुपये रिर्यादीने दिले होते. दिलेल्या पैशाचे त्यांनी फिर्यादी यांना त्यांचे सूर्यकोटी मल्टीस्टेट निधी लिमीटेड नावाच्या संस्थेच्या पावती क्रमांक 805, 850, 870 या दिल्या होत्या. त्यानंतर त्याचे कडे माझे व्याजाचे पैसे मागण्यासाठी गेले असता ते दोघे पुढच्या महिन्यात देतो असे म्हणायचे व वेळ मारुन नेत असे. परंतु त्यांनी आज पावेतो गुंतवणुक केलेल्या पैशाचे व्याज दिले नाही किंवा मुद्दल सुद्धा परत दिले नाही. तेव्हा दिनांक 29/05/2024 रोजी फिर्यादी त्याचे संस्थेच्या कार्यालयात गेले असता त्यांनी सांगितले की लावज्रच आम्ही पैसे परत करू परंतु

31/05/2024 रोजी रात्री माहीत झाले की, प्रशांत भारत जैस्वाल त्याचा भाऊ पंकज उर्फ योगेश भारत जैस्वाल हे त्यांचे घर व गाव सोडुन पळुन गेले आहे.सुर्यकोटी मल्टीस्टेट निधी लिमीटेड या संस्थेत पैसे गुंतपणुक करा असे म्हणुन गावातील अनेक लोकांचा विश्वास संपादन केला त्यामुळे फिर्यादीकडून कडुन एकुण पाच लाख रुपये 5,00,000/- रुपये घेतले व मला कोणत्याही प्रकारचे माझ्या पैशावर व्याज दिले नाही किंवा माझे मुद्दल पैसे न देता माझी पाच लाख रुपये 5,00,000/- रुपयाची फसवणुक केली आहे.

तसेच माझ्या गावातील इसम नामे ) विलास दत्तात्रय काटे यांची 1,00,000/- मला सागतल का तुम्हा एक तारखेपर्यंत याचा आम्हा तुम्हाला तुमचे सगळे पैसे देवुन टाकु

31/05/2024 रोजी रात्री मला माहीत झाले की, प्रशांत भारत जैस्वाल त्याचा भाऊ पंकज उर्फ योगेश भारत जैस्वाल हे त्यांचे घर व गाव सोडुन पळुन गेले आहे. फिर्यादी सोबत

1) विलास दत्तात्रय काटे यांची 1,00,000/- (अक्षरी एक लाख रुपये ) 2) दत्तात्रट किसन काटे यांची 5,00,000/- (अक्षरी पाच लाख रुपये ) 3) कैलाश दत्तात्रट काटे यांची 4,00,000/- (अक्षरी चार लाख रुपये ) 4) पांडुरंग मारुती शेळके यांची 4.25,000/- (अक्षरी चार लाख पंचवीस हजार रुपये), 5) मदन बबनराव मोरे 6,00,000/- (सहा लाख रुपये), 6) ज्ञानेश्वर दगडु वाघमारे 2,00,000/- (दोन लाख रुपये ). 7) दादासाहेब गणपतराव बनसोडे 1,50,000/- (एक लाख पन्नास हजार रुपये), 8) पांडुरंग सुरेश भुसारी 5,00,000/- (पाच लाख रुपये), (9) भाऊसाहेब साईनाथ देवढे 5,00,000/- (पाच लाख रुपये) असे एकुण 33,75,000/- (अक्षरी तेहतीस लाख पंचाहत्तर हजार रुपये) यांची देखील फिर्यादी प्रमाणेच प्रमाणे गुंतवणुक करायला लावुन त्यांचेकडुन पैसे घेवुन त्यांना त्या पैशावर व्याज न देता त्याची सुध्दा आर्थिक फसवणुक केली आहे. तरी सदर इसम नामे प्रशांत भारत जैस्वाल वय 30 वर्ष त्याचा भाऊ पंकज उर्फ योगेश भारत जैस्वाल रा. मुंगी ता. शेवगाव जिल्हा यांनी संगणमत करून वरील उलेख केलेल्या एक ते नऊ इसमांचा विश्वास संपादन करुन त्याचे संस्थेत पैसे गुंतवणुक करण्यास सांगुन त्याच्या संस्थेत पैसे गुंतवल्यावर व्याज व मुद्दल घेवुन पळुन गेले आहे. तसेच त्यांनी गावातील 38,75,000/- (अक्षरी अडोतीस लाख पंचाहत्तर हजार रुपये) रुपयाची आर्थिक फसवणुक केली आहे. तरी सदर इसमावर गुन्हा दाखल करावा. मी माझे फिर्यादीसोबत त्यांनी मला दिलेल्या सुर्यकोटी मल्टीस्टेट संस्थेची दिलेली तीन मुळ पावत्या हजर करीत आहे अशी माहिती त्यावेळी शेवगांव पोलिसांना फिर्यादीत दिली आहे मुंगी गावातील स्वप्नील उत्तम चपडे 7 लाख रुपये त्यांची आई सोनाबाई किसनराव चपडे आणि त्यांच्या कुटुंबियांकडून सुमारे 20 लाख रुपये मुद्दल भामट्याने घेतली त्यासरशी त्यांनी आपले दोन एकर बागायती शेत कवडीमोल दराने विकले त्याच्या वसुली साठी फोन केले असता संबंधित भामट्याने आई बहिणीवर शिव्या देऊन जीवे मारण्याची धमकी चपडे कटुंबाला दिली होती

 

 

 

*अटक झालेला आरोपी त्याचा फरार भाऊ आणि वडील लोकांना गोड बोलून चल पुढच्या वढ्यात करत राहिले अजुन सुमारे तीन कोटी रुपयांची फसवणूक झालेले लोक आज येतील उद्या येतील असं म्हणुन फिर्याद देण्यास मागे पुढे होत आहेत शेअर मार्केट ने तालुका हजारो कोटी रुपयांना मुकला असताना त्यात या निधी अर्बन लिमिटेत वाल्यानी सुद्धा उडी घेतल्याचे दिसत आहे काहींनी यांच्या नादी लागून शेत विकले काहींनी सोन गहाण ठेवलं काहींनी मोठ्या ब्यांकेतील मुदत ठेव पावत्या मोडल्या काहींनी नोकरीचे रिटायरमेंचे पैसे या भामट्यांच्या हवाली केले*

 

 

प्रविण भिसे शेवगांव

सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें