खाद्य तेलासह इतर जिवनावश्यक वस्तूंची दरवाढ थांबविण्याची चाळीसगाव तहसीलदार यांना रयत सेनेचे निवेदन
चाळीसगाव प्रतिनिधी : – अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये युध्दजण परिस्थिती असल्याने त्याचे पडसाद जागतिक बाजार पेठेवर पडले आहे सध्य स्थितीला गॅस, पेट्रोल, डिझेल याची टंचाई असली तरी भारत सरकारने काही कर कमी करून पेट्रोल डिझेल व गॅसचे भाव स्थिर ठेवले आहेत, तरी देखील चाळीसगाव येथे काही व्यापाऱ्यांनी मनमानी पद्धतीने खाद्य तेलासह इतर जिवनावश्यक वस्तूंची केलेली दरवाढ थांबवून गोरगरीब जनतेला दिलासा देण्याची मागणी चाळीसगावचे नायब तहसीलदार संदेश निकुंभ यांना रयत सेनेच्या वतीने दि ६ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, चाळीसगाव शहरातील काही व्यापाऱ्यांनी खाद्य तेल व खाद्य वस्तूंचा साठा करून भाव वाढ करण्यास सुरुवात केली आहे. सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल, शेंगदाणा तेलासह इतर खाद्यतेल व खाद्य पदार्थांच्या किमती वाढवल्या आहेत.
सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा व इतर खाद्य वस्तू भारतात पिकवल्या जातात. शेतकऱ्यांना या धान्य मालाचे भाव कमी मिळतात मग भाववाढ होण्याचे कुठलेही कारण नसताना जीवनावश्यक वस्तूंचे भाव का वाढतात हे मोठे गौडबंगाल आहे तसेच जागतिक युद्ध सुरु असले तरी डिझेल, पेट्रोल चे भाव स्थिर आहेत त्यामुळे वाहतूकीमुळे कुठलेही दर वाढण्याचा प्रश्न येत नाही तरी देखील खाद्यतेल, खाद्यवस्तू, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ ही अन्यायकरक असून व्यापाऱ्यांची मनमानी आहे.
यापुढे जिवनावश्यक वस्तू, खाद्यतेल, खाद्यवस्तू चे भाववाढ करावयाची असल्यास त्याचे ठोस कारण काय असे पत्र (तहसीलदार) यांनी व्यापाऱ्यांना सूचना देण्याची सक्ती करून व्यापारी व महसूल प्रशासन यांची बैठक घेवून भाववाढ करावी त्यामुळे आपणास व जनतेला भाववाढ कशामुळे झाली हे समजेल. आधीच जनता महागाई मुळे त्रस्त आहे शिवाय गरीब व्यक्ती दिवसाला ३०० ते ५०० रुपये कमवतो त्यात खाद्यतेल व खाद्यवस्तुचे भाव वाढल्यास त्याचे कंबरडे मोडेल. महाशय, युद्धजन्य परिस्थिचा फायदा घेवून जीवनावश्यक वस्तू, खाद्यतेल, खाद्यवस्तू यांचा साठा करून ज्यादा दराने विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची चौकशी करून त्यांचेवर कारवाई करावी तसेच जीवनावश्यक वस्तूचे दर नियंत्रणात ठेवून गोरगरीब जनतेला दिलासा देण्याची मागणी चाळीसगावचे नायब तहसीलदार संदेश निकुंभ यांना रयत सेनेच्या वतीने दि ६ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, निवेदनावर रयत सेनेचे प्रदेश सचिव प्रमोद वाघ, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, तालुका अध्यक्ष प्रदीप मराठे, शहरअध्यक्ष शिवाजी गवळी, कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष संजय हीरेकर, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, भरत नवले, शहर कार्याध्यक्ष प्रकाश गवळी, शहर उपाध्यक्ष सतीश पवार , समाधान सोनवणे, वरून वाणी, रमेश सोनार, वसंत बाविस्कर, भूषण पाटील, जितेंद्र भोसले,सुधीर पाटील, शकील खान यांच्यासह रयत सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत,











