वाई : विराज शिंदेंच्या घरावर आज राष्ट्रवादीचा धडक मोर्चा राष्ट्रवादीने बदलला ‘राजकीय गेअर’; सभापती निवडीतील भूमिकेवरून आक्रमक पवित्रा

वाई : विराज शिंदेंच्या घरावर आज राष्ट्रवादीचा धडक मोर्चा

राष्ट्रवादीने बदलला ‘राजकीय गेअर’; सभापती निवडीतील भूमिकेवरून आक्रमक पवित्रा

सातारा प्रतिनिधी 

वाई: सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर वाई तालुक्यात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. नामदार मकरंद आबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने आता आक्रमक पवित्रा घेतला असून, आज विराज शिंदे यांच्या निवासस्थानावर भव्य निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वाईच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

 

काय आहे नेमकं प्रकरण?

सातारा जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (मकरंद आबा गट) सदस्या ऋतुजा शिंदे यांनी पक्षाच्या आदेशाविरोधात जाऊन चक्क भाजपाच्या कोट्यातून सभापती पदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली. पक्षाशी एकनिष्ठ न राहता विरोधी गटाशी हातमिळवणी केल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादीने आता हे युद्ध थेट रस्त्यावर लढण्याचे ठरवले आहे.

विराज शिंदेंच्या घरावर धडकणार मोर्चा

ऋतुजा शिंदे यांच्या या भूमिकेला त्यांचे पती आणि युवा नेते विराज शिंदे यांचा पाठिंबा असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे. या ‘राजकीय बंडाचा’ जाहीर निषेध करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमधील रोष व्यक्त करण्यासाठी उद्या राष्ट्रवादी काँग्रेसने वाई येथील गणपती मंदिरापासून विराज शिंदे यांच्या घरावर धडक मोर्चाचे आयोजन केले आहे.

> “ज्या पक्षाने ताकद दिली, त्याच पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना जनतेच्या न्यायालयात जाब द्यावा लागेल. हा मोर्चा म्हणजे केवळ निषेध नसून ही भविष्यातील संघर्षाची ठिणगी आहे.”

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें