पुरवठा निरीक्षकासह लाच घेताना दोघाना रंगेहात पकडले

पुरवठा निरीक्षकासह लाच घेताना दोघाना रंगेहात पकडले

सातारा प्रतिनिधी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) सातारा पथकाने आज मोठी कारवाई करत कोरेगाव येथील पुरवठा निरीक्षण अधिकारी आनंद कैलास शिंदे यांच्यासह एका खाजगी इसमाला रंगेहात पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या भारत गॅस एजन्सीच्या गोडावूनची वारंवार तपासणी टाळण्यासाठी तसेच एजन्सीविरुद्ध आलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी आरोपी आनंद शिंदे यांनी सुरुवातीला २ लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ही रक्कम १ लाख २५ हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली.
दरम्यान, तक्रारदाराने ३१ मार्च रोजी २५ हजार रुपये दिले होते. उर्वरित रकमेबाबत सतत मागणी होत असल्याने तक्रारदाराने १ एप्रिल रोजी ACB सातारा कार्यालयात तक्रार दाखल केली. पडताळणीदरम्यान लाच मागणीची खात्री झाल्यानंतर आज (६ एप्रिल) सापळा रचण्यात आला.
या कारवाईत आरोपी शिंदे यांच्या सांगण्यावरून खाजगी इसम अवधूत दिलीप कालेकर यांनी जनसेवा सहकारी बँक, कोरेगाव परिसरात १ लाख २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ACB पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुप्रिया गावडे करीत आहेत.
दरम्यान, नागरिकांनी लाच मागणीबाबत तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें