अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार, चाळीसगाव रेल्वे उड्डान पुलावरील दुर्दैव घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार, चाळीसगाव रेल्वे उड्डान पुलावरील दुर्दैव घटना

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) -: 

काल 6 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहरातील रेल्वे पुलावर झालेल्या दुचाकीचा भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली, या अपघातात एका दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत अर्जुन अनिल नरवाडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी पूनम अर्जुन नरवाडे या गंभीर जखमी झाल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार, अर्जुन नरवाडे व त्यांची पत्नी बाजार करून घरी परतत असताना हा अपघात घडला. नरवाडे दाम्पत्य हे मूळ जामनेर येथील रहिवासी असून कामानिमित्त चाळीसगाव येथील डेराबर्डी परिसरात वास्तव्यास आहे. अपघाताच्या वेळी रेल्वे पुलावरून जात असलेले चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन वाल्हे यांनी तत्काळ घटनास्थळी थांबत घटने स्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या सहकाऱ्याने मदतकार्य सुरू केले. त्यांनी तातडीने अॅम्ब्युलन्सला पाचारण करून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम पोलीसांकडून सुरु आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें