लोणंदमध्ये सादिक बागवान यांच्या प्रसंगावधानतेमुळे ज्वेलर्सवरील चोरीचा प्रयत्न हाणून पाडला

लोणंदमध्ये सादिक बागवान यांच्या प्रसंगावधानतेमुळे ज्वेलर्सवरील चोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे

लोणंद शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या वाघमोडे ज्वेलर्स या दुकानावर मध्यरात्री सुमारे ३.३० वाजता चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठे आर्थिक नुकसान टळले.

घटनास्थळावरून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ४ ते ५ चोरटे चेहऱ्यावर मास्क बांधून, हातात दुकान फोडण्यासाठी लागणारे लोखंडी साहित्य व धारधार हत्यारे घेऊन दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करण्याच्या तयारीत होते. याच वेळी तेथून दुचाकीवरून जात असलेले सादिक जब्बार बागवान यांच्या ही संशयास्पद हालचाल लक्षात आली.क्षणाचाही विलंब न करता त्यांनी प्रसंगावधान दाखवत घडलेला प्रकार तात्काळ त्यांनी हर्षवर्धन शेळके पाटील यांना फोनवरून कळवला. त्यानंतर लगेचच लोणंद पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली.सदर चारचाकीचा पाठलाग करण्यात आला असता ती गाडी ज्वेलर्सकडून स्टँडकडे, त्यानंतर सातारा रोडने पुढे जाऊन पुन्हा खंडाळा रस्त्याच्या दिशेने भरधाव वेगाने निघून गेली.

दरम्यान, हर्षवर्धन शेळके पाटील यांनी वाघमोडे ज्वेलर्सचे मालक वाघमोडे यांना सुरू असलेल्या घटनेची माहिती देत तात्काळ घटनास्थळी येण्याची सूचना केली.सादिक जब्बार बागवान यांच्या सतर्कतेमुळे लाखो रुपयांचे संभाव्य नुकसान टळले. चोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात यश आल्याने लोणंद शहरातील सर्व स्तरांतून सादिक बागवान यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें