जिल्हा परिषदेच्या वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाला उत्साहात सुरुवात विभागीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी दोन कोटींची तरतुद – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

जिल्हा परिषदेच्या वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाला उत्साहात सुरुवात

विभागीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी दोन कोटींची तरतुद

– ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

सातारा, दि.7 : शासनाच्या विविध विभागांच्या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवांना शासनाचा निधी असतो, परंतु जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवा निधी मिळावा यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा अहवाल प्राप्त झाला असून विभागीय व राज्यस्तरीय क्रीडा व महोत्सवासाठी 2 कोटीं निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

 येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हा परिषदेच्या वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उमेश घुले यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते

 ग्रामविकास मंत्री म्हणून नाही तर एक सहकारी म्हणून या वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाला आलो आहे, असे सांगून ग्रामविकास मंत्री श्री. गोरे म्हणाले, या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सावाचे चांगले नियोजन केले आहे. याबद्दल सर्व अधिकारी, कर्मचाऱ्याचे अभिनंदनही त्यांनी केले.

श्री. गोरे म्हणाले, सातारा जिलह्याला ऐतिहासिक परपंरा आहे. जिल्ह्यात ज्या चांगल्या गोष्टी घडतात त्या देशासाठी मार्गदशक ठरतात. स्पर्धेमध्ये मनापासून व खीलाडूवृत्तीने सहभाग घ्यावा. जिल्हास्तरीय स्पर्धा झाल्यानंतर विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहेत, त्या स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्याचा दबदबा राहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले

जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांचा तणव कमी व्हावा, आपापसात संवाद व्हावा यासाठी क्रीडा व सांस्कृतिक महोत्साचाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धा आनंदाच्या वातावरणात पार पडतील, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नागराजन यांनी व्यक्त केला.

अधिकारी, कर्मचाऱ्यांचे उत्कृष्ठ संचलन व चित्ररथाद्वारे संस्कृती व परंपरेचे दर्शन

वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात सहभागी संघातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट असे संचलन केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती यांनी चित्ररथाद्वारे ऐतिहासिक, संस्कृती, परंपरा यासह आरोग्य, शिक्षण याची माहिती चित्ररथाद्वारे दिली. 

 

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें