Breaking News
चाळीसगाव येथे औषध विक्रेत्यांचा संपात सहभाग, तहसीलदारांना दिले विविध मागण्यांचे निवेदन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा अधिक तीव्र 👉घोषणाबाजी, निषेध सभेद्वारे शासनाविरोधात संताप व्यक्त श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या विशेष सर्वसाधारण सभेतील ठराव आणि सभेची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप करत विरोधकांनी आता उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला साखरवाडीत अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक पोलिसांना निवेदन देत तातडीच्या कारवाईची मागणी चाळीसगाव धुळे मेमू ट्रेन नियमीत करा रयत सेनेची निवेदना द्वारे मागणी चाळीसगाव येथे हॉटेल चालकावर जुन्या वादातून जीवघेणा हल्ला
विशेष बातम्या

साखरवाडीत अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक पोलिसांना निवेदन देत तातडीच्या कारवाईची मागणी

साखरवाडीत अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक पोलिसांना निवेदन देत तातडीच्या कारवाईची मागणी साखरवाडी प्रतिनिधी  साखरवाडी येथे गावामध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थांनी एकत्र येत सोमवारी (१८ मे २०२६) साखरवाडी पोलिस ठाण्यात निवेदन दिले. गावात जुगार, अवैध दारू विक्री, ताडी, मटका, गांजा तसेच इतर नशा पदार्थांचे व्यवसाय सर्रास सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.           गावातील वाढत्या अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून शिक्षण आणि नैतिक मूल्यांपासून दूर जात असल्याची चिंता निवेदनातून व्यक्त करण्यात आली. तसेच गावातील शांतता आणि सुरक्षिततेवर परिणाम होत असून अनेक कुटुंबे आर्थिक व

राजकारण

श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या विशेष सर्वसाधारण सभेतील ठराव आणि सभेची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप करत विरोधकांनी आता उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला

फलटण प्रतिनिधी : श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या विशेष सर्वसाधारण सभेतील ठराव आणि सभेची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप करत विरोधकांनी आता उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पत्रकार परिषद घेऊन विरोधकांनी आपली भूमिका स्पष्ट केली.   पत्रकार परिषदेत आ. सचिन पाटील, प्रल्हादराव साळुंखे पाटील, श्रीमंत शिवबाजीराजे खंडेकर, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, अॅड. नरसिंह निकम, विश्वासराव भोसले, विलासराव नवले आदी उपस्थित होते.   विरोधकांनी सांगितले की, विशेष सर्वसाधारण सभेतील काही निर्णय हे सभेच्या कार्यक्षेत्राबाहेरील असून, ते नियमबाह्य पद्धतीने मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे सभेतील ठरावांना न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे.  

मत आणि मतभेद

एसटी संवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी बंजारा समाजाचा चाळीसगाव येथे मोर्चा मागणीचे दिले निवेदन

एसटी संवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी बंजारा समाजाचा चाळीसगाव येथे मोर्चा मागणीचे दिले निवेदन (चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) चाळीसगाव येथे आज बंजारा समाज बांधवांनी हैदराबाद गॅझेट नुसार एसटी संवर्गातून आरक्षण मिळावे या मुख्य मागणीसाठी भव्य महामोर्चा काढला, शहरातील नागद रोड इथून सुरू झालेला हा मोर्चा चाळीसगाव तहसील पर्यंत गेला पारंपारिक वेशभूषित महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते, जय सेवालाल विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला या मोर्चात केवळ चाळीसगाव शहरातील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते, मोर्चा तहसील पर्यंत गेल्यानंतर मोर्चाचे रूपांतर

जाहिरात